☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸    ☸ कृष्णमूर्ती ज्योतिष शिक्षणाचे केंद्र  |  जून २००० पासून कार्यरत  |  डोंबिवली, महाराष्ट्र  |  प्रवेश सुरू  ☸  
संकेत ज्योतिष मंडळ
संकेत ज्योतिष मंडळ · डोंबिवली

संस्थेविषयी माहिती

जून २०००

जून २००० पासून फक्त कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत शिकविणारी एकमेव संस्था म्हणजे संकेत ज्योतिष मंडळ आज २५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे. स्वर्गीय श्री. शहासने सरांनी या संस्थेची स्थापना केल्यानंतर स्वर्गीय श्री. आचार्य सरांनी हा वारसा पुढे चालविला व आता मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रदिप मोरे सर व कार्याध्यक्षा सौ. उज्ज्वला गुंजीकर मॅडम आणि निपुण शिक्षक वर्ग ही जबाबदारी यशस्वीरित्या निभावत आहेत.

या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे जरी वर्ग 'ऑनलाईन' घेतले जात असले तरी एका वर्गात जास्त विद्यार्थ्यांचा भरणा नाही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे पूर्ण लक्ष देता येते. तसेच विद्यार्थ्यांना आधीच करून ठेवलेले व्हिडिओ दिले जात नाहीत आणि महागडी सॉफ्टवेअर किंवा पुस्तके सुद्धा विकत घेण्याची गरज नाही.

LIVE कुंडल्यांद्वारे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास आणि विश्लेषण विद्यार्थ्यांना वर्गात शिकविले जाते. कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीमध्ये 'नियम' हे अचूक आणि मोजकेच असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय समजण्यास सोपे जाते.

आठवड्यातून फक्त २ तास, शनिवार अथवा रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 'विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे' वर्गाची वेळ ठरविली जाते. दर महिन्याला नवीन वर्ग सुरु होत असतात. प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

लाइव्ह कुंडली अभ्यास लहान वर्ग बुक्स नाही आठवड्यातून २ तास ऑनलाईन (झूम) दरमहा नवीन बॅच

मंडळाचे प्रमुख

श्री प्रदिप मोरे
अध्यक्ष श्री. प्रदिप मोरे
सौ. उज्ज्वला गुंजीकर
कार्याध्यक्षा सौ. उज्ज्वला गुंजीकर
Maharashtra Jyotish Parishad

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेबरोबर संलग्न

रजि. नं. बॉम्बे/७०९/८१/जी.बी.बी.एस.डी. सार्व. विश्वस्त क्र. एफ ७२९४

आमचा संस्थेचा अभिमान आहे की आम्ही महाराष्ट्र ज्योतिष परिषद या प्रतिष्ठित संस्थेबरोबर संलग्न आहोत. ज्योतिषशास्त्राच्या प्रसारासाठी आणि पारंपरिक ज्ञानाच्या जतनासाठी ही संलग्नता आमच्या कार्याला दिशा देते.

शिकविले जाणारे अभ्यासक्रम

के. पी. ऍस्ट्रो-वास्तू अभ्यासक्रम

के. पी. पद्धतीतून वास्तूची ओळख, दिशांची ओळख, घराची रचना, प्रवेशद्वार, शयनगृह, देवघर आदी विषयांचा अभ्यास.

अधिक माहिती

कृष्णमूर्ती ज्योतिष विशारद

विवाह, संतती, नोकरी, आरोग्य, परदेशगमन, घर — live कुंडल्यांद्वारे सखोल अभ्यास.

अधिक माहिती

कृष्णमूर्ती ज्योतिष प्रश्नकुंडली

नोकरी, रोग, घर, परदेशगमन, विवाह, हरवलेली वस्तू, कर्ज, स्पर्धा परीक्षा.

अधिक माहिती

उपाय व मंत्र साधना

ज्योतिष्याने ज्योतिष शास्त्रात गती प्राप्त होण्यासाठी साधना, उपासना व उपाय.

अधिक माहिती

संपूर्ण पंचांग वाचन

पंचांग वाचन, मुहूर्त काढणे, विवाह/गृहप्रवेश/उपनयन यांचे शुभ मुहूर्त.

अधिक माहिती

कृष्णमूर्ती ज्योतिष भास्कर

विवाह, संतती, शिक्षण, नोकरी प्रगत अभ्यास. राहू/केतूचे संपूर्ण कार्येशभाव.

अधिक माहिती

कृ. प. व शेअर बाजार

शेअर बाजारातील चढ-उतार समजण्यासाठी कृष्णमूर्ती पद्धतीचा उपयोग.

अधिक माहिती

कृष्णमूर्ती ज्योतिष शिकण्यासाठी किंवा सल्ला सेवेसाठी आमच्याशी संपर्क साधा.